शिवतेज करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विकास करण्यासाठी आणि मानसिक बळकटीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पोलीस व सैन्य शारीरिक चाचणीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला १६०० मीटर धावण्याचा ट्रॅक उपलब्ध आहे. लांब उडी, गोळाफेक आणि पुल-अप्स बार्सची राष्ट्रीय मानकांप्रमाणे रचना केली गेली आहे.
दूरवरून येणाऱ्या मुला-मुलींसाठी अकॅडमी आवारातच स्वतंत्र, सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्याची सोय. सैन्य शिस्तीनुसार दिनक्रम पाळणे बंधनकारक असून राहण्यासाठी स्वच्छ खोल्या उपलब्ध आहेत.
मैदानी सरावानंतर शरीराला लागणारे प्रथिने आणि ऊर्जा देणारा सकस आहार मेसमध्ये पुरवला जातो. आहारात मोड आलेली कडधान्ये, अंडी, दुध, आणि चौरस घरगुती जेवणाचा समावेश असतो.
गरीब व होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात दर्जेदार मार्गदर्शन. कोणतीही लपलेली फी नाही. तुमच्या सोयीनुसार योग्य पॅकेज निवडा.
शारीरिक आणि लेखी परीक्षेची पायाभूत तयारी
शाश्वत यशासाठी संपूर्ण आणि सखोल तयारी
निवड होईपर्यंत अकॅडमीचे अखंड सहकार्य
सामाजिक बांधिलकी आणि खाकी वर्दीचे स्वप्न!
शिवतेज करिअर अकॅडमी सामाजिक भावनेतून अनाथ (Orphan) विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत प्रवेश देते. यामध्ये मोफत लेखी शिक्षण, शारीरिक चाचणी सराव, राहण्याची हॉस्टेल सोय आणि दोन्ही वेळचे मेसचे भोजन पूर्णपणे मोफत पुरवले जाते. आमचा ध्यास केवळ देशसेवा व पोलीस सेवेत प्रामाणिक तरुण भरती करणे आहे.